बस आणि कार अपघातात चार जण ठार

 बस आणि कार अपघातात चार जण ठार

नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील करंजाळी येथे काल सायंकाळी एसटी बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोन जण गंभीर जखमींना नाशिक येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.Four killed in bus and car accident

पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर करंजाळी जवळील वळणावर हा अपघात झाला. एसटी महामंडळाची पेठ आगाराची बस (एमएच ४० वाय ५९७४) पेठ येथून पुण्याला जात होती. तर सनी कार (जीजे ०६-एफसी ३३३१) ही नाशिकहून गुजरातकडे जात होती. पेठ तालुक्यातील करंजाळी येथे वळणावर हा भीषण अपघात झाला.

ML/KA/PGB
9 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *