चौकशी सुरू , अतिरिक्त पोलीस महासंचालक जालन्यात दाखल.

जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाल संजय सक्सेना जालन्यात आज दाखल झाले.मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी चौकशीसाठी ते जालन्यात दाखल झाले आहेत.
औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे ही बैठकीसाठी हजर होते . जालन्याचे जुने एसपी तुषार दोषी, नवीन एसपी शैलेश बलकवडे आणि पुण्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. लाठीचार्ज प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक याच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. Investigation underway, Additional Director General of Police admitted in Jalna.
ML/KA/PGB
4 Sep 2023