आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक उतरले नदीपात्रात

बीड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुळज येथे गोदावरी नदीपात्रात उतरून मराठा समाजातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले. तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील
अंतरवाली सराटी येथून सुरू झालेलं आंदोलन वेगवेगळ्या गावात उग्र रूप धारण करत आहे.गेवराई तालुक्यातील गुळंज या गावाच्या जवळूनच गोदावरी नदी वाहते.या नदीपात्रात उतरून गावातील मराठा समाजाच्या नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले.या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संतोष खोमणे यांच्यासह अधिकारी या ठिकाणी दाखल झाले.
आंदोलनकर्त्याशी चर्चा केल्यानंतर हेे आंदोलन मागे घेण्यात आले. Protesters came down to the riverbed to demand reservation
ML/KA/PGB
3 Sep 2023