अमित शहा म्हणाले, तुम्हाला नसेल पण जनतेचा विश्वास आमच्यावर आहेच

 अमित शहा म्हणाले, तुम्हाला नसेल पण जनतेचा विश्वास आमच्यावर आहेच

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर अविश्वास दर्शक ठराव आणल्यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मणिपूर मधील हिंसाचार हा संपूर्णपणे वांशिक संघर्ष आहे त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.मणिपूर मधील हिंसाचार हा संपूर्णपणे वांशिक संघर्ष आहे त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

” मी देशभरात फिरत असतो. जनतेशी आम्ही संवादही केला आहे. अविश्वास दाखवणं सोडा त्याची झलकही आम्हाला दिसत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दीर्घ काळाने जनतेचा ज्या सरकारवर विश्वास आहे असं सरकार म्हणजे मोदी सरकार आहे. नरेंद्र मोदी सरकारला दोन तृतीयांश बहुमत देऊन जनतेने निवडून दिलं. देशात ३० वर्षांनी संपूर्ण बहुमताचं सरकार बसलं आहे. तसंच स्वातंत्र्यानंतर जर कुणी लोकप्रिय पंतप्रधान असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत “असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह म्हणाले, “मणिपूरच्या मुद्द्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. मणिपूरमधील वातावरण बिघडायला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. २०२१ मध्ये आपल्या शेजारचा देश असलेल्या म्यानमारमध्ये म्हणजेच ब्रह्मदेशात सत्तापरिवर्तन झालं. तिथलं डेमोक्रेटिक सरकार पडून मिलिटरी राज आलं. त्यामुळे म्यानमारमधील कुकी डेमोक्रेटिक संघटना लोकशाहीसाठी आंदोलनं करू लागली. परिणामी तिथल्या मिलिटरी शासनाने कुकी समुदायावर दबाव आणला. खरंतर आपली आणि म्यानमारची सीमा मोकळी आहे. सीमारेषेवर कोणतंही फेन्सिंग (कुंपण) नाही. ही परिस्थिती आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची आहे. म्यानमारमध्ये मिलिटरी राज आल्यावर तिथले कुकी समुदायातले लोक भारतात येऊ लागले. हजारोंच्या संख्येने कुकी लोक मणिपूर आणि मिझोरमच्या जंगलांमध्ये राहू लागले. परिणामी मणिपूरच्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मणिपूर प्रश्नावर केंद्राने हाती घेतलेल्या उपाययोजनांबद्दल ते म्हणाले, “मणिपूरमध्ये होणारी घुसखोरी आम्ही आतापर्यंत १० किलोमीटरपर्यंत फेन्सिंग केलं आहे. ६० किलोमीटर फेन्सिंगचं काम सुरू आहे. तर सीमावर्ती भागातील ६०० किलोमीटरपर्यंतच्या प्रदेशाचं सर्वेक्षण सुरू आहे. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी २०१४ पर्यंत फेन्सिंग का केलं नाही? असा प्रश्न निर्माण होते.”

SL/KA/SL

9 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *