लोकसभेत उडाली राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात चकमक

 लोकसभेत उडाली राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात चकमक

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारवर अविश्वास दर्शक ठराव आणल्यावर आज लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यामध्ये चांगलीच शाब्दीक चकमक घडली.काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत आहे, असं विधान राहुल गांधींनी केल्यानंतर त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या भाषणावर तीव्र आक्षेप घेतला.

राहुल गांधी म्हणले . “यांनी मणिपूरमध्य हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”.

दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. स्मृती इराणींनी यावर आक्षेप घेत राहुल यांच्यावर प्रखर टिका केली. “देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेच्या हत्येबाबत बोललं गेलं. काँग्रेस पक्ष यावर टाळ्या वाजवत होता. यातून अवघ्या देशाला संदेश दिला की कुणाच्या मनात गद्दारी आहे. मणिपूर विभाजित नाही, तो आमच्या देशाचा एक भाग आहे. डीएमकेच्या एका सदस्याने तमिळनाडूत म्हटलं की भारत म्हणजे फक्त उत्तर भारत.राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर त्यांचं वक्तव्य फेटाळून दाखवावं”, असं थेट आव्हान स्मृती इराणींनी दिलं.

“काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं काश्मीरमध्ये जनमताबाबत थेट कोर्टात विधान केलं. जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर या देशाला त्यांनी सांगावं की काश्मीरला देशापासून वेगळं काढण्याच्या कारस्थानात काँग्रेसच्या त्या नेत्याचं विधान का आहे? तुम्ही अजिबात ‘इंडिया’ नाहीत”, असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, मोदींशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याशी मणिपूरवर चर्चा न करण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवरही स्मृती इराणींनी टीका केली. “हे म्हणतात मणिपूरवर चर्चा करा. देशाचे गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांनीही सांगितलं की चर्चा करा, आम्ही तयार आहोत. पण हे पळून गेले. आम्ही नव्हतो पळून गेलो. कारण काय? कारण गृहमंत्री जेव्हा बोलायला लागतील, तेव्हा यांना गप्प बसावं लागेल”, असं त्या म्हणाल्या.

SL/KA/SL

9 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *