क्रांती दिनानिमित्त नागपुरात काढण्यात आली तिरंगा यात्रा

नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ऑगस्ट क्रांती दिन, क्रांती दिनानिमित्त गांधी शांती मिशन संस्था च्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आलेली होती. नागपुरातील चितार ओळी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्या पासून ते शहीद चौक पर्यंत ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली होती. यात सामान्य नागरिकांसह शाळकरी मुले देखील हातात तिरंगी झेंडे घेवून सहभागी झालेले होते. मुलांचा लेझीम पथक सहभागी झालेले होते.
ML/KA/SL
9 Aug. 2023