निसर्गकवी ना.धो. महानोर यांचे निधन

 निसर्गकवी ना.धो. महानोर यांचे निधन

पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर(८१) यांचे आज पुण्यात रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. महानोर यांचं पार्थिव आज पुण्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पळसखेड येथे अंतिम अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

रानातल्या कविता, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पानझड, कवितेतून गाण्याकडे, अजिंठा, अशा एकाहून एक कवितासंग्रहांमधुन त्यांनी मराठी काव्य रसिकांच्या मनावर राज्य केले. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं.

याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

SL/KA/SL

3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *