लवकरच येत आहे Twitter ला टक्कर देणारे App

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क हे टेक्नॉलॉजीतील जगातील आघाडीचे उद्योजक नवीन Apps लाँच करत एकमेकाना मात देत असतात. मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांचे इंस्टाग्राम एका नवीन ॲपवर काम करत आहे. याची स्पर्धा एलॉन मस्क यांच्या ट्विटरशी होईल. त्याचे नाव थ्रेड आहे जे 6 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. मेटा या वर्षी जानेवारीपासून प्रोजेक्ट 92 अंतर्गत हे ॲप विकसित करत आहे. ॲप लॉन्च होण्यापूर्वी ॲपल स्टोअरवर दिसत आहे. आगामी थ्रेड्स हे मजकूर-आधारित संभाषण ॲप असेल. ट्विटरवर जशी शब्द मर्यादा आहे, तशीच थ्रेडवरही असेल.
ॲप स्टोअरवर उपलब्ध माहितीनुसार वापरकर्ते त्यांचे इन्स्टाग्राम खाते वापरून थ्रेड्समध्ये लॉग इन करू शकतील. जे वापरकर्ते इन्स्टाग्रामवर फॉलो करतात ते त्यांना थ्रेडवरही फॉलो करू शकतील. सध्यातरी थ्रेड्स ॲपबद्दल एवढीच माहिती उपलब्ध आहे.
ॲपच्या वर्णनात असे म्हटले आहे की सध्याच्या आणि ट्रेंडिंग विषयांवर चर्चा करण्यासाठी समुदाय एकत्र येऊ शकतात. याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या निर्मात्यांशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही तुमच्या कल्पना आणि मते सामायिक करून एक निष्ठावान अनुयायी देखील तयार करू शकता. हे ॲप तुमची आर्थिक माहिती, संपर्क माहिती यांसारखा डेटा गोळा करेल.
थोडक्यात टेक्नोसॅव्ही नेटकऱ्यांना आपली मते मांडण्यासाठी अजून एक प्लॅटफॉर्म Thread App मुळे खुले होणार आहे.
SL/KA/SL
4 July 2023