‘बाईपण भारी देवा’ ची दणदणीत कमाई

 ‘बाईपण भारी देवा’ ची दणदणीत कमाई

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोहीणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा दमदार अभिनेत्रींसह केदार शिंदे दिग्दर्शीत ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने या वर्षातली मराठी सिनेमातली आजवरची ही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

जिओ स्टुडीओ प्रस्तुत या चित्रपटाला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद लाभला असून बाईपण भारी देवा सिनेमाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय. या सिनेमाने विकेंडला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलीय.या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर ६.४५ कोटींची कमाई केली आहे.

या यशाबद्दल बाईपण भारी देवा चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणतात,” ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन.”

मे महिन्यात प्रदर्शित झालेला केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारसे यश मिळवू शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर ‘बाईपण भारी देवा’चे हे यश केदार शिंदे यांना मिळाले आहे.

SL/KA/SL

4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *