देशातील पहिला एलिव्हेटेड टॅक्सी-वे

 देशातील पहिला एलिव्हेटेड टॅक्सी-वे

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिला एलिव्हेटेड टॅक्सी-वे (ईस्टर्न क्रॉस टॅक्सी-वे) तयार झाला आहे.हा टॅक्सी वे टर्मिनल-१ व टर्मिनल-३ यांना एकमेकांशी जोडेल. वाऱ्याच्या दिशेनुसार विमान कधी द्वारका तर कधी राष्ट्रीय महामार्गाकडील टर्मिनलमध्ये लँड करतात. तेथून त्यांना नऊ किमी धावपट्टीवरून हँगर पॉइंटवर यावे लागत होते. हा टॅक्सी-वे सुरू झाल्यानंतर हे अंतर कमी होऊन केवळ २ किमी असेल. यामुळे विमान लँड केल्यानंतर एक्झिटपर्यंत पोहोचण्याच्या वेळेत २५ मिनिटे कमी होतील.

या टॅक्सी-वेची चाचणी यशस्वी झाली आणि तो सुरू करण्यासाठी डीजीसीएकडे मंजुरी मागितली आहे. मंजुरी मिळाल्यास १५ जुलैपर्यंत या टॅक्सी वेचे लोकार्पण होणे अपेक्षित आहे.

दिल्ली विमानतळ रोज ११०० विमानांची ये-जा होते. तीन रनवे ताशी ७५ विमाने सांभाळू शकतात, पण टॅक्सी-वे नसल्यामुळे दर तासाला केवळ ६५ विमाने सांभाळता येतात. विमानांसाठी टॅक्सिंगच्या वेळेत कपात केल्याने उड्डाणांची वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल आणि ज्यांना विमानात बसून राहावे लागत असे आणि टर्मिनलपर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती अशा प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.नवीन लिंक विमानतळास एक वर्तुळाकार मार्गाचे रूप प्राप्त होईल.

SL/KA/Sl

4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *