टपाल कार्यालय देणार रेल्वेचे कन्फर्म तिकीट
पणजी,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सर्व क्षेत्रात खासगीकरण होत असल्याची चर्चा होत असताना केंद्र सरकारचे विविध विभाग मात्र हातात हात घालून विकसित होताना दिसत आहेत. भारतीय रेल्वे आणि पोस्ट खाते यामध्ये सर्वांत आघाडीवर असल्याचे दिसते. पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आज रेल्वे तिकिच आरक्षण प्रणाली काऊंटरचे उद्घाटन करण्यात आले.
सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते ४ या दरम्यान हे या तिकिट खिडकीवर सामान्य आणि तत्काळ तिकिटांचे बुकींग आणि कॅन्सलेशन सुविधा उपलब्ध असणार आहेत.
टपाल खात्याकडून सुरू करण्यात आलेले हे गोव्यातीव पाचवे तिकीट सेंटर आहे. गोव्या बरोबरच देशाच्या इतर राज्यांमध्येही हा प्रयोग करण्यास रेल्वे खाते इच्छुक असून यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि केंद्र सरकारचे उपक्रम एकमेकांच्या साथीने यशस्वी देखील होतील.
SL/KA/SL
23 June 2023