राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती

 राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला यशस्वी ९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राज्यात ‘मोदी@९’ हे महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत उत्तर मुंबई जिल्ह्याच्यावतीने कांदिवली येथे भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता संवाद आणि प्रबुद्ध वर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती असल्याचे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सी. टी. रवी म्हणाले की, समाजात प्रबुद्ध वर्गही आहे आणि दुर्बूध्द असणारे लोकही आहेत. फक्त नियतीची गरज आहे. भाजपाकडे नितीही आहे, नेताही आहे आणि नियतही आहे. भाजपाची निती आणि इतर राजकीय पक्षांच्या नितीमध्ये फरक आहे. राष्ट्र पहिले ही आपली निती आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकीवेळी देशासमोर गुजरातच्या विकासाचे मॉडेल ठेवले. त्यावर जनतेने विश्वास ठेवून मतदान केले.

पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना मतदान करून पंतप्रधान केले. जनता हीच त्यांचा परिवार आहे, असेही सी. टी. रवी यावेळी म्हणाले.

या अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर हे बोलताना म्हटले की, हे अभियान एवढ्यासाठी आहे की आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता लाभला व ९ वर्षात आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर रोषण करण्याचे काम मोदी यांनी केले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे ९ वर्षाची कारकीर्द जनतेसमोर नीट जावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेली विकासकामे, केलेले प्रकल्प, योजना, विविध समाज घटकांसाठी केलेली कामं ही तळागाळापर्यंत पोचवी म्हणून हे अभियान देशभर सुरु आहे.

आज सर्व देश पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. यात पंतप्रधान मोदींचे अपारकष्ट आहेत. म्हणून आज जो वर्ग नेहमी भाजपाच्या मागे उभा राहिलाय किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, नेतृत्व केल्यानंतर समाजातील जो बुद्धीजीवी वर्ग आहे तो मोदींच्या नेतृत्वावर प्रभावित आहे. त्यामुळे जनतेचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम देशभर पक्षाच्यावतीने सुरु आहे.

या प्रसंगी केंद्रीय संसदीय बोर्डाच्या सदस्या डॉ. सुधा यादव, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, अभियानाचे सहसंयोजक कृपाशंकर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/SL

5 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *