यंदा पाऊस काहीसा विलंबाने
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याचा शेवटचा आठवडा आला की, संपूर्ण देशाला वेध लागतात ते नैऋत्य मौसमी पावसाच्या आगमनाची. केरळमध्ये दाखल होऊन नंतर हळूहळू संपूर्ण देशभर पसरणारा मान्सून यावर्षी काहीसा विलंबाने येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मान्सून अंदमानमध्ये दरवर्षी साधारणत: २२मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्याची सुरूवात कमकुवत असून अंदमान तसेच केरळ किनाऱ्यावरही पाऊस विलंबाने पोहोचणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. केरळच्या किनारपट्टीवर नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होत असतो. ४ जून रोजी देशाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यात मॉन्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशीराने होऊ शकते. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते. यंदा तो तीन दिवस उशीराने केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
एल-निनोच्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून पावसाविषयी साधक-बाधक चर्चा सुरू असतानाच, नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा तीन दिवस उशीराने होण्याची शक्यता आहे.
ML/KA/SL
17 May 2023