रमी खेळणं हा जुगार नाही -उच्च न्यायालय

 रमी खेळणं हा जुगार नाही -उच्च न्यायालय

बंगळुरू, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या ऑनलाईन गेमिंगमुळे रमीसारखे पत्त्यांचे खेळ खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. या सध्या ट्रेंडीं कर्नाटक उच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंगबाबत एक मोठा निकाल दिला आहे. पत्त्यांमधला रमी खेळ हा जुगार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. कृष्णा कुमार म्हणाले की, या खेळात पैसे गुंतवले असले किंवा नसले तरीही रमी हा खेळ कौशल्याचा आहे, संधीचा नाही. त्यामुळे या खेळाला जुगार म्हणता येणार नाही. ३२५ पानांच्या या निर्णयात न्यायमूर्ती कुमार यांनी म्हटलं आहे की, सीजीएसटी कायद्यातील सट्टेबाजी आणि जुगार या अटींमध्ये कौशल्याच्या खेळांचा किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश नाही आणि असा समावेश करता येणार नाही.

ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म गेम्सक्राफ्टला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इंजेलिजन्स डायरोक्टोरेट जनरलने जारी केलेल्या २१ हजार कोटींहून अधिकच्या नोटिशीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने असं मत मांडलं.

गेमक्राफ्ट या ऑनलाईन मोबाईल गेम्स बनवणाऱ्या कंपनीला ८ सप्टेंबर २०२२ रोजी जीएसटी अधिकाऱ्यांनी एक नोटीस पाठवली होती. यामध्ये २१ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या नोटिशीला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेम्सक्राफ्ट कंपनीने न्यायालयात आपला युक्तिवाद मांडताना म्हटलं होतं की, पैसे गुंतवले असले तरी कौशल्याच्या जोरावर खेळल्या जाणाऱ्या या खेळाला सट्टेबाजी म्हणता येणार नाही. कारण हा खेळ कौशल्याचा आहे.

SL/KA/SL

16 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *