राज्याचा विकास करायचा तर डबल इंजिन सरकार हवे
बंगळुरू, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचा पूर्ण क्षमतेनं विकास करायचा असेल तर केंद्राप्रमाणं राज्यात सुद्धा समविचारी डबल इंजिनवालं सरकार हवं हे कर्नाटकातील सूज्ञ जनता ओळखून आहे त्यामुळे इथली जनता भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमतानं निवडून देईल,असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्नाटकात बेंगळुरू इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळत असताना पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था एकदम भक्कम झाली आहे भारताची 11 व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था केवळ पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच पाचव्या क्रमांकावर आली आहे तसंच त्यांची लोकप्रियता इथं निघालेल्या त्यांच्या रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सिद्ध झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा मुख्यमंत्री या नात्याने आपण बेळगावला प्रचारासाठी जाणार असल्याचंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. If we want to develop the state, we need a double engine government
ML/KA/PGB
7 May 2023