रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा रंगला थरार..

 रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा रंगला थरार..

सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या रेठरेहरणाक्ष या ठिकाणी चक्क रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा थरार रंगला होता.रेठरेहरणाक्ष गावाच्या सदगुरु जंगली महाराज यात्रेनिमित्त या अनोख्या ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

https://youtu.be/O5axPMPAvFM

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर डम्पिंग रिव्हर्स स्पर्धां मध्ये सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील 74 ट्रॅक्टर चालक-मालिकांनी सहभाग घेतला होता.600 मीटर अंतर पार करण्याच्या रिव्हर्स प्रकारात साताराच्या कराड येथील बाबर माची या ट्रॅक्टर चालकाने पहिला नंबर पटकावला,अनुक्रमे दहा हजार 7 हजार आणि 5 हजार अशी विजेत्या ट्रॅक्टर चालकांना बक्षीस देण्यात आली. या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

ML/KA/PGB
7 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *