भुवनेश्वर येथे महाबोधी शांती स्तुपाचे भूमिपूजन
भुवनेश्वर दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओरिसा भुवनेश्वर येथे महाबोधी सोसायटी च्या कलिंग बुद्धविहार येथे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2567 व्या जयंती सोहळ्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.
यावेळी कलिंग बुद्धविहार परिसरात उभारण्यात येणाऱ्या महाबोधी शांती स्तुपाचे भूमिपूजन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भन्ते रत्नलोका थेरो;महाबोधी सोसायटी चे ओरिसा सेंटर चे डॉ. सुरेंद्र कुमार मोहपत्रा; अध्यक्ष डॉ महेंद्र सिंग;सचिव नरेंद्र कुमार मिश्रा; आर पी आय (आ)चे ओरिसा राज्य अध्यक्ष अब्दुल वली; लेखिका नम्रता चड्डा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/SL
5 May 2023