तब्बल ३६ पानी अनोखी लग्नपत्रिका
बुलढाणा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या लग्नसराईमुळे राज्यभर सनई-चौघडे वाजत आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये आपले वेगळेपण दाखवण्यासाठी तरुणाईकडून वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या जातात. याची सुरुवातच होते ती लग्नपत्रिकेच्या मांडणीपासून. अशीच एक अनोखी लग्नपत्रिका व्हायरल होते आहे. या लग्नपत्रिकेने एका वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधले असून ही पत्रिका एक दोन नव्हे तर तब्बल ३६ पानांची आहे.
बुलढाणा येथील निवृत्त झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची ही ३६ पानांची आहे.
एशिता शिखरे आणि मयूर डोंगरे हे दोघेही उच्च शिक्षित असून उच्च पदावर कार्यरत आहेत यांचा शुभ विवाह 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या पत्रिकेत एशिता आणि मयूरचा फोटो अल्प परिचय देण्यात आला आहे. याच बरोबर शिखरे परिवाराचा फोटो व माहिती देखील देण्यात आली आहे.
त्याचबरोबर या पत्रिकेमध्ये आवली व संत तुकाराम, शिव-पार्वती विवाह सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती तसेच जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई संत मुक्ताबाई, अक्का महादेवी यांची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील जिजाऊ प्रकाशन यांनी ही पत्रिका तयार केली आहे.
SL/KA/SL
20 April 2023