OTT वर येतोय रितेश-जिनिलियाचा ‘वेड’

 OTT वर येतोय रितेश-जिनिलियाचा ‘वेड’

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रितेश आणि जिनिलिया देशमुख या रसिकांच्या लाडक्या मराठी बॉलिवूड जोडीच्या ‘वेड’ ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘वेड’ चित्रपटानं खरंच प्रेक्षकांना वेड लावलं. दाक्षिणात्य चित्रपट ‘माजिली’ चा रिमेक असणारा ‘वेड’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपट ओटीटीवर केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. ‘वेड’ चित्रपट येत्या २८ एप्रिल पासून डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. यासाठी त्यांच्याकडं डिस्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन असणं गरजेचं आहे.

मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली निर्मिती वेड चित्रपटानं नुकतेच त्याचे १०० दिवस पूर्ण केले. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या १०० दिवसात तब्बल ७५ कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

वेड या चित्रपटामधून रितेश देशमुखने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तर जिनिलिया प्रथमच मराठी चित्रपटात अभिनय केला आहे.


या चित्रपटात रितेश-जेनिलियासह विद्याधर पाठारे आणि अशोक सराफ यांच्याबरोबरच विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे, बाल कलाकार खुशी हजारे यांच्या भूमिका आहेत. सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून चित्रपटात एका गाण्यापुरती हजेरी लावली आहे.

SL/KA/SL
13 April 2023

SL/KA/SL

13 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *