येत्या आठवड्यात तीव्रतेने वाढणार तापमान
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचे सावट पसरले आहे. एप्रिल दुसरा आठवडा उलटून गेल्याने गेल्या काही दिवसात तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात देशातील तापमान ३ ते ५ अंशाने वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
उन्हाच्या झळा तीव्र होण्याबरोबरच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
SL/KA/SL
9 April 2023