उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडरवर मोठी सवलत
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वच क्षेत्रांत महागाईच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या मध्यमवर्गासाठी केंद्र सरकारने काहीसा दिलासादायक निर्णय घेतला आहे. देशात करोडो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडीची मुदत वाढवली आहे.
गत वर्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी (अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला आता अजून एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थी सहभागी आहेत.
SL/KA/SL
28 March 2023