अखेर पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात प्रवेश

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमावर्ती भागात पाककडून सतत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे भारतीयांच्या मनात एकंदरीतच पाकिस्तान बद्दल काहीशी विद्वेषाची भावना आहे. यामुळेच पाकमधील कलाकार, गायक, खेळाडू यांच्या भारतात येण्याला देशभरातून विरोधी प्रतिक्रिया उमटत असतात.
अशा साऱ्या परिस्थितीमुळे गेल्या ७ वर्षांपासून पाकचा क्रिकेट संघ भारतात आलेला नाही. पण आता एक दिवसीय विश्वचषक क्रिकेटच्या निमित्ताने पाकचा संघ भारतात येणार आहे. पाकच्या खेळाडूना लवकरच व्हिजा मिळेल असं आश्वासन बीबीसीआय ने दिलं आहे.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रंगणार आहेत. २०१६ च्या विश्वचषका दरम्यान पाकचा संघ भारतात आला होता.
भारत – पाक क्रिकेट संघाची होणारी चुरशीची लढत दोन्ही देशांतील क्रिकेच रसिकांना हवीहवीशी वाटते. आता तब्बल सात वर्षांनी हा योग पुन्हा जुळुन येणार आहे.
SL/KA/SL
22 March 2023