खाजगी ट्रॅव्हल्सने ही दिली महिला प्रवाश्यांना 50 टक्के सूट

 खाजगी ट्रॅव्हल्सने ही दिली महिला प्रवाश्यांना 50 टक्के सूट

चंद्रपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसेस मध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशन ने घोषणा केली आहे.

काल संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयावर आजपासून म्हणजे गुडीपाडव्या च्या मुहूर्तावर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.एसटी च्या निर्णयानंतर खाजगी बस चालकांना बसला जोरदार फटका बसला होता त्यानंतर तातडीने असा उपाय शोधण्यात आलाय. Private Travels has given 50 percent discount to women travelers

ML/KA/PGB
22 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *