हे भारतीय कलाकार आहेत ऑस्करचे आत्तापर्यंतचे मानकरी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नुकताच 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. भारताने या सोहळ्यात यंदा तब्बल २ पुरस्कार पटकावले असून संपूर्ण देशभरात विजेत्यांचे कौतुक होत आहे. शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यापूर्वीही काही भारतीय कलाकारांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल जाणून घेऊया…
भानू अथैया (कॉस्ट्यूम डिझायनर : १९८२)
भानू अथैया या कॉस्ट्यूम डिझायनरना १९८२ मध्ये रिलीज झालेल्या गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन कॅटेगरीमधील ऑस्कर मिळाला होता. ऑस्कर जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
सत्यजित रे (फिल्म मेकर : १९९२)
सत्यजित रे यांना १९९२ मध्ये ऑस्कर सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.ऑस्कर सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्कार जिंकणारे ते भारतातले पहिले फिल्ममेकर होते. पाथेर पांचाली (1955), अपराजितो (1956), अपूर संसार (1959), द म्युझिक रुम (1958), चारुलता (1964) आणि द चेस प्लेयर्स (1977) हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट आहेत.
रेसुल पुकुट्टी (साऊंड मिक्सिंग : २००८)
स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रेसुल पुकुट्टी यांना २००८ मध्ये सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील अनेक चित्रपटांचे साऊंड मिक्सिंग केलं आहे.
ए.आर. रहमान (संगीतकार : २००९)
2009 मध्ये ए.आर. रहमानने दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले.
ए.आर. रहमान हा केवळ संगीतकार नाही तर तो गायक, गीतकार आणि निर्माता देखील आहे.
गुलजार (बेस्ट ओरिजनल : २००९)
८१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गुलजार यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांना स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी बेस्ट ओरिजनल कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
एम.एम किरवाणी आणि चंद्रबोस (‘ओरिजनल सॉन्ग’ : २०२३)
९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी एम.एम किरवाणी आणि चंद्रबोस यांना ‘ओरिजनल सॉन्ग’ या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला.
गुनीत मोगा आणि कार्तिकी गोन्साल्विस (सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म : २०२३)
‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. गुनीत मोगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.These are the Indian actors who have won the Oscars so far
ML/KA/PGB
13 Mar. 2023