शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी महत्त्वाची अटक

 शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी महत्त्वाची अटक

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे.

साईनाथ दुर्गे हे मुंबईबाहेर होते. सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले.

प्राथमिक माहितीनुसार, ‘मातोश्री’ या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. यानंतर आता साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे.Important arrest in Sheetal Mhatre video case

ML/KA/PGB
13 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *