मंत्रालयात पाचशे कोटींचा जाहिरात घोटाळा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचशे कोटी रुपयांच्या जाहिरात कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलीच नाही, हे बेकायदेशीर आहे, हा घोटाळा आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला.
याबाबतच्या चौकशीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले होते, त्यात वरिष्ठ अधिकारी दोषी आढळलेले आहेत, आता नव्या मुख्यमंत्र्यानी कार्योत्तर परवानगी घेण्याचे आदेश काढले आहेत, हा पांघरूण घालण्यासाठी प्रयत्न आहे , हे कसे करता येईल असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला .
याप्रकरणी सर्व दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली, यावर सरकारने तातडीने दखल घेऊन त्यावर कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली.
ML/KA/SL
9 March 2023