औरंगजेबाचे उदात्तीकरण गांभिर्याने घ्या

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजी नगर इथं औरंगजेबाचं उदात्तीकरण करत काही जण उपोषण करत असल्याचं प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावं असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी आज विानपरिषदेत दिले. Take Aurangzeb’s exaltation seriously
सरकारने वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकारी नेमून यामागचे धागेदोरे तपासून घ्यावेत असं गोर्हे यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या उपोषणासंदर्भात संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत, हे प्रकरण देशद्रोहा पर्यंत जाऊ शकतं, असं यावर बोलताना संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
ML/KA/PGB
8 Mar. 2023