शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत सभात्याग

 शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत सभात्याग

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने, गारपीट आणि जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावला गेला आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दखल घेऊन मदत करण्याची घोषणा करावी असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला , त्यावर सरकार दखल घेत नाही असा आरोप करीत त्यांनी सभात्याग ही केला.

छगन भुजबळ यांनी याला पाठिंबा दिला, जग होळी खेळत असताना शेतकऱ्यांच्या जीवाची होळी झाली, कांद्याला अजून योग्य भाव नाही , सरकार मदत देत नाही, तातडीने सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी केली होती. नाना पटोले यांनी ही सर्व कामकाज बंद करून यावर चर्चा घ्या अशी मागणी त्यांनी केली.

उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

आठ जिल्ह्यात तेरा हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत एकूण 13,729 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं आहे. अधिक माहिती येत आहे, हा शेतकऱ्यांचा विषय आहे, सरकार गंभीर , तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले आहेत ती येताच मदत जाहीर करू असं ही फडणवीस यांनी सांगितले.

याआधी विरोधी पक्षाच्या वतीने याबाबत दाखल करण्यात आलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावले होते.आम्ही तातडीने पंचनामे सुरू केले आहेत, मुख्यमंत्र्यानी तसे आदेश दिले आहेत, विरोधकांचे अश्रू मग, त्यांनी यापूर्वी सत्तेत असताना कोणतीही मदत केली नाही, आता त्यांना राजकारण करायचे आहे, नुकसान ग्रस्त भागांचे पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार लगेच मदत देईल , आमचे सरकार शेतकऱ्यांचे आणि संवेदनशील आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.Absenteeism in the Assembly over the issue of farmers

कांदा , चणा डाळ खरेदी सुरू

राज्य सरकारने कांदा खरेदी सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्याला सरासरी १५ ते १६ रुपये प्रति किलो इतका दर चांगल्या कांद्याला मिळाला आहे अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत सरकार चर्चा करत नाही , मदत जाहीर करत नाही असा आक्षेप घेत विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला होता त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

याशिवाय ५२५ केंद्रांवर चणा डाळ खरेदीची नोंदणी सुरू झाली आहे, तिथे टोकन देऊन मग खरेदी सुरू होईल असं ही ते म्हणाले यामुळे हे दोन्ही खरेदी सुरू झालेलं नाही असा विरोधकांनी केलेला आरोप चुकीचा असल्याचं ते म्हणाले.

ML/KA/PGB
8 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *