अदानी ग्रुप काढणार दुबई, लंडन आणि अमेरिकेत रोड शो

 अदानी ग्रुप काढणार दुबई, लंडन आणि अमेरिकेत रोड शो

मुंबई,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवाला नंतर गेले काही दिवस भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजली होती. अदानींचे शेअर्स देखील झपाट्याने घसरत होते. मात्र यातून लवकरच सावरत अदानी समूह गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी वेगाने पावले टाकत आहे. अदानी ग्रुपने काही बॅंकांची थकलेली कर्जेही परतफेड करण्यास सुरूवात केली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून अदानी समूह 7 मार्च ते 15 मार्च दरम्यान अमेरिका, लंडन आणि दुबईमध्ये रोड शो करणार आहे.

या रोड शो ला ‘फिक्स्ड इन्कम रोड-शो’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून अदानी समूह आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. रोड शोव्यतिरिक्त अदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी इतर अनेक प्रयत्न करत आहे.

अदानी ग्रुप मॅनेजमेंटचे सदस्य आणि ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर जुगशिंदर सिंग हेदेखील रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. या रोड-शोच्या माध्यमातून ते गुंतवणूकदारांना भेटू शकतील आणि गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढवतील, अशी समूहाला आशा आहे. रम्यान अदानी समूहाने सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये फिक्स्ड इन्कम रोड-शो केले होते. त्यांना चागले यशही मिळाले.

SL/KA/SL
8 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *