अदानींनी फेडले १५०० कोटींचे कर्ज

 अदानींनी फेडले १५०० कोटींचे कर्ज

मुबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवाला नंतर गेले काही दिवस भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजली होती. अदानींचे शेअर्स देखील झपाट्याने घसरत होते. जागतिक पातळीवरील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गौतम अदानींचे स्थानही घसरले होते. अशा सर्वबाजूंनी अडचणीत सापडलेल्या अदानी समुहाकडून आज एक आश्वासक बातमी समोर आली आहे.

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने 1,500 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे आणि मार्चमध्ये देय असलेल्या व्यावसायिक कागदपत्रांमध्ये आणखी 1,000 कोटी रुपयांची परतफेड करण्यात येईल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अदानी समूहाच्या फर्मने SBI म्युच्युअल फंडाला रु. 1,000 कोटी आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाला रु. 500 कोटी रु रक्कम परतफेड केली आहे.
या बाबत अदानी कंपनीच्या प्रवक्त्यांने सांगितले, ” ही परतफेड आम्ही सध्याची रोख शिल्लक आणि व्यवसाय ऑपरेशन्समधून निर्माण झालेल्या निधीतून केली आहे. यामुळे बाजारात कंपनीवरील विश्वास वृद्धींगत होण्यास मदत होईल.”

“एसबीआय एमएफने अदानी समूहाकडे सुमारे 1,000 कोटी रुपयांचे एक्सपोजर ठेवले होते, जे मॅच्युरिटीवर परतफेड केले गेले आहे. आमच्याकडे अदानी समूहाकडे आणखी कोणतेही एक्सपोजर नाही,” असे SBI म्युच्युअल फंडा प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
SL/KA/SL
23 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *