होळी निमित्त तयार होतआहे हर्बल,नैसर्गिक गुलाल
नागपुर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळी निमित्त रंगांची धुळवड करीत असतांना सर्वत्र केमिकल युक्त गुलाल आणि विविध रंग बाजारात सर्रास विक्री केली जाते मात्र नागपूरात आता नैसर्गिक रंगाची मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागल्याने नागपूरात ठिकठिकाणी नैसर्गिक गुलाल तयार केले जात आहे .
या नैसर्गिक गुलालाला मोठी मागणी वाढत आहे . ठिकठिकाणी हर्बल गुलाल तयार केले जात असून रासायनिक गुलाल, रंगापेक्षा हे हर्बल गुलाल, रंग फायदेशीर असल्याने नागरीक यंदा पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक रंगाचा मदतीने होळी चा सण साजरा करणार असल्याचे चित्र दिसत आहे .
नागरिकांनी हर्बल आणि नैसर्गिक गुलाल घेउन होळी साजरी करावी असे आवाहन करण्यात येत आहे Herbal, natural Gulal is being prepared for Holi
ML/KA/PGB
5 Mar. 2023