धानखरेदीला मुदतवाढ
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धानखरेदीची मुदत एकतीस मार्च पर्यंत वाढवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
वन पट्टे धारक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार इतकी आहे त्यापैकी सतरा हजार जणांची नोंदणी आँनलाईन पध्दतीने झाली आहे उर्वरित नोंदणी तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली.
मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मारहाण झाल्याप्रकरणी संबधित प्राध्यापक निलंबित करण्यात आला आहे, त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यावर विद्यापीठाने पुढे काय कारवाई केली याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली, हा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.
ML/KA/SL
2 March 2023