स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी गार्डन थिम पार्क आणि संग्रहालय
नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. या निमित्त राज्यभरात स्वातंत्र्यवीरांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि साहित्यक्षेत्रातील योगदानाबाबत माहिती देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील भगुर हे सावरकराचे जन्मगाव. भगुर येथे महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाद्वारे त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारे भव्य गार्डन थिम पार्क आणि सग्रंहालय यांची उभारणी करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा या
दरम्यान, आज स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त सकाळी भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत अष्टभुजा देवीची पालखीही होती. त्यानंतर सकाळी ९ ते १०.३० यादरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित आणि सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित सावरकर आणि मृत्यू, या संवादाचे बद्रीश कट्टी आणि आदित्य धलवार यांचे अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम पार पडले.
भगूरचे महत्त्व
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म दि. 28 मे, 1883 रोजी भगूरमधील सावरकर वाड्यात झाला. बालपणापासूनच राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरांनी याच वाड्यात अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर ‘सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. त्यानंतर पुढे सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक सुधारणेचे कार्य, काव्य व साहित्यातील योगदान व राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलेला असीम त्याग, समर्पण, सोसलेल्या हालअपेष्टा आपण सर्वजण जाणतोच. स्वा. सावरकर हे आजही देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान आहेत.