मिसेस चॅटर्जी vs नॉर्वेच्या चित्तथरारक ट्रेलरने पाणावले डोळे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ९० च्या शतकातील बहुचर्चित अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
राणीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे.
या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. याचा ट्रेलर पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येते. आपल्या बाळांसाठी आई कोणत्या ठरला जाऊ शकते याचा अनुभव या चित्रपटाचा ट्रेलर पाहून येतो. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे.
राणी मुखर्जी ही गेले अनेक महिने अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.बॉलिवूड मधली ही मर्दानी अभिनेत्री नवी सिनेमात कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राणीचे चाहते सुद्धा तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
अखेर राणीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे या चित्रपटातून राणीने पुन्हा एकदा तिचा शानदार अभिनय दाखवलाय.
मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वेच्या ट्रेलरची सुरुवात मिसेस चॅटर्जीच्या व्यक्तिरेखेपासून होते. ती कलकत्ता सोडून तिच्या पती आणि मुलांसह नॉर्वेमध्ये राहते. मिसेस चॅटर्जी तिचे आयुष्य आनंदात जगते.
आणि अचानक एके दिवशी असे काही घडते की सर्वकाही बदलून जाते. तिची दोन्ही मुलं कायद्याचा नावाखाली हिरावून घेतली जातात.
ती चांगली आई नाही असे म्हटले जाते. यानंतर मिसेस चॅटर्जीचा आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा लढा सुरू होतो आणि ती आई म्हणून संपूर्ण देशाविरुद्ध उभी राहते.
हा चित्रपट फक्त ट्रेलर मधून इतका चाहत्यांना भावविवश करणारा आहे तर संपूर्ण चित्रपट कसा असेल हे पाहण्यासाठीची दर्शकांमधली उत्सुकता वाढली आहे.
ML/KA/PGB
23 Feb. 2023