शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळी..

 शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळी..

बीड, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीडच्या माजलगावात शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून भव्य प्रतीमा साकारली आहे.

शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळीतून 25 हजार स्क्वेअर फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलीय. तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून आठ दिवस ही रांगोळी पूर्ण करण्यास वेळ लागला असून आठ कारागीराणी हे काम केले आहे. हे पाहण्यासाठी माजलगाव व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.Rangoli of Shivaji Maharaj on 25 thousand square feet..

कशी साकारली रांगोळी

परभणी येथील छञपती आर्ट् ग्रुप मधील कैलास राखोंडे, मारुती भैरट, वैष्णवी पांचाळ, अंबिका गायकवाड , मिथुन आडे, केशव वरणे, अनुष्का चांदेल, गणेश शेजूळ या 8 कलाकारांनी ही प्रतिमा रांगोळीद्वारे साकारलीय. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजता शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात आलीय.

शिवजन्मोत्सव नेहमी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आमचा मानस असतो त्यातूनच ही रांगोळी मध्ये भव्य प्रतिमा साकारण्याची संकल्पना सुचली आणि त्याला परभणी येथील कलाकारांनी आठ दिवसाची मेहनत घेऊन योग्य आकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रतिमा साकारता आली असेल संयोजक बाळू ताकट यांनी सांगितले.

ML/KA/PGB
19 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *