अमित शहा यांनी दिली दीक्षाभूमीला भेट
नागपूर, दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून आज सकाळच्या सुमारास त्यांनी दीक्षाभूमी स्मारकाला भेट दिली. दीक्षाभूमी येथे पोहचल्यावर स्मारक समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
दीक्षाभूमी येथे पोहचल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले तसेच गौतम बुद्ध यांचे देखील दर्शन घेत पुष्प अर्पण केले. यावेळेला बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच स्मारक समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करीत स्मृती चिन्ह आणि पुस्तक भेट देण्यात आली.
त्यांनी अभिप्राय पुस्तिकेत अभिप्राय देखील लिहिला. यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव आणि सदस्य उपस्थित होते.
ML/KA/SL
18 Feb. 2023