शिक्षकाने तयार केली अनोखी विज्ञान पेटी
बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवले जातात.मात्र या प्रयोगशाळा अधिक खर्चिक असतात यावर उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील होळ येथील होळेश्वर विद्यालयाचे शिक्षक अत्तम राठोड यांनी वेगवेगळ्या टाकाऊ वस्तू पासून ही विज्ञान पेटी तयार केली आहे.या विज्ञान पेटी मधून ते विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवत अध्यापन करत आहे.A unique science box created by the teacher
काय केलं या शिक्षकाने
माध्यमिक स्तरावर असलेल्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतविज्ञान या विषयांमध्ये अनेक संकल्पना समजावून सांगताना प्रयोगांचा वापर केला जातो त्यासाठी शाळेला प्रयोगशाळा हवी असते मात्र ज्या ज्या शाळांकडे प्रयोगशाळा नाहीत अशा शाळा ज्या शाळांकडे प्रयोगशाळा नाहीत अशा शाळा मधील विज्ञान विषयाचे शिक्षक या पेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रयोग दाखवू शकतात त्यासाठी राठोड यांनी आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध टाकाऊ वस्तूंचा वापर या विज्ञान पेटीमध्येे केला आहे.
त्यामुळे अतिशय अल्प खर्चा मध्ये म्हणजेच हजार ते दीड हजार रुपयात 70 ते 80 विज्ञानाचे प्रयोग दाखवणारी पेटी तयार केली आहे. ही पेटी विज्ञान प्रयोगशाळा नसणाऱ्या शाळांसाठी उपयुक्त ठरणार आहे.यामध्ये फेकून देणारे स्ट्रा,सेल रिकामी बॉक्स यांचा वापर करून प्रयोगाची साहित्य तयार केली आहेत .
राठोड यांनी केलेल्या या प्रयोग पेटीचे मुंबई येथे केंद्र सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या वेस्टर्न इंडिया सायन्स फेअर मध्ये सादरीकरण करण्यात आले.
सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर या पेटीत होत असल्याने आणि सहज वर्गात अध्यापन करताना या साहित्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे या पेटी च्या माध्यमातून विज्ञानाबद्दल् विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यास मदत होणार आहे.
ML/KA/PGB
17 Feb. 2023