राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणी आजही अपूर्णच

 राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणी आजही अपूर्णच

दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात सात महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता पालट प्रकरणी सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आजही अपूर्णच राहिली असून उद्या तरी ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

आमदार अपात्रता, राज्यपालांची भूमिका आदी अनेक विषय यात असून पाच सदस्यीय घटना पीठ तयार केल्यावर आता ती सात सदस्यीय घटना पीठा समोर घ्यावी यावर गेले दोन दिवस सुनावणी सुरू आहे.The power struggle hearing in the state is still incomplete

काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्यासह तीन जणांनी बाजू मांडली, आज शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल यांनी बाजू मांडली.अरुणाचल प्रदेशच्या नाबाम खटला केवळ चर्चे पुरता असून त्यावर पुनर्विचार करण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
उध्दव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध न करताच राजीनामा दिला त्यामुळे अनेक मुद्दे गैरलागू होतात असे ही त्यांनी सांगितले.

नाबाम खटल्याचा पुनर्विचार करावा लागला तर तो आम्ही देखील करू शकतो आम्हीही संविधान पीठ च आहोत असे न्यायालयाने यावेळी सांगितले , दरम्यान उद्या पुन्हा सुनावणी सुरू राहणार आहे.

ML/KA/PGB
15 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *