तृतीयपंथीयांसाठी हे ओळखपत्र असणं गरजेचे

 तृतीयपंथीयांसाठी हे ओळखपत्र असणं गरजेचे

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईच्या जीटी रुग्णालयात तृतीयपंथी रुग्णांवर उपचार करण्यासाठी नुकताच वेगळा वार्ड सुरू करण्यात आला आहे.मात्र तो तृतीयपंथी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला हे ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा तो उपचारापासून वंचित राहू शकतो.

यापूर्वी तृतीयपंथी यांनी कोणत्या वार्डात उपचार घ्यावेत, पुरुष की स्त्री याबाबत काहीही स्पष्टता नव्हती. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नव्हते.बऱ्याच रुग्णालयात त्यांना प्रवेश नाकारला जात होता.आता मात्र तृतीयपंथीयांसाठी उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

तृतीयपंथीयांसाठी राखीव वार्ड कुठला?

मुंबईच्या जीटी रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर सर्वसामान्य रुग्णांच्या आयसीयू कक्षा समोरच तृतीयपंथीयांसाठी 13 क्रमांकाचा वेगळा राखीव वार्ड सुरू करण्यात आला आहे.या वार्डात एकूण 30 खाटा आहेत.या वार्डात रुग्णांना भेटण्यासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला सोडण्यात येणार आहे.तसेच येथे कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई करण्यात आली आहे. तंबाखू,दारू,विडी,सिगारेट आदी तंसम पदार्थाचे सेवन करण्यास मज्जाव आहे.It is necessary to have this identity card for the third parties

हे ओळखपत्र सादर करावे लागणार

इथे दाखल होऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना तो तृतीयपंथी आहे ,हे सिद्ध करण्यासाठी त्याला सरकारी यंत्रणेने दिलेले ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. ते जर नसेल तर जिल्हाधिकारी, सामाजिक न्याय विभाग किंवा तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे ओळखपत्र असणं गरजेचं आहे.यासाठी रुग्णालयाच्या नोंदी मध्ये तृतीयपंथी किंवा इतर असा लैगिंक ओळख देणारा रकाना ठेवण्यात आला आहे. असे रुग्णालय प्रशासनाने तयार केलेल्या नियमावलीत म्हटले आहे.

ML/KA/PGB
11 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *