ई-सिगारेटचा साठा जप्त
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेली ई-सिगरेटचा साठा करून ठेवणाऱ्या एका व्यापाराला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी पथकाने अटक केली. अशोक शामलाल कटारा (55, रा.अंधेरी) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाराचे नाव आहे. त्याच्याकडून 2 लाख 25 हजाराचे विविध कंपनीचे ई-सिगारेट व त्याचे फ्लेवरचा साठा रोख 12 हजार ,असा एकून 2 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .Seized stock of e-cigarettes
अंमलबजावणी शाखेची कारवाई
एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत कॉफोट मार्केट मध्ये भारत सरकारने प्रतिबंधित केलेला इलेक्ट्रॉनिक सिगारेट अनधिकृत साठा वितरण व विक्री करीता ठेवण्यात आला आहे.अशी विश्वसनीय माहिती गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली.
त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले .
या ठिकाणी टाकला छापा
या पथकाने महात्मा जोतिबा फुले मार्केट (कॉफेट मार्केट) मधील सुविधा कलेक्शन, शॉप नं. ३२९, या ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात भारत सरकारने प्रतिबंधित केलेला परदेशी बनावटीच्या 2 लाख 25 हजाराचे विविध कंपनीचे ई-सिगारेट व त्याचे फ्लेवरचा साठा रोख 12 हजार असा एकून 2 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .या प्रकरणी
अशोक कटारा या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून यास अटक करण्यात आली आहे.
ML/KA/PGB
9 Feb. 2023