पोलीस ठाण्याच्या लॉकप मधल्या ९ जणांना विषबाधा

 पोलीस ठाण्याच्या लॉकप मधल्या ९ जणांना विषबाधा

वसई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पोलीस ठाण्याच्या लॉकप मध्ये असलेल्या ९ आरोपींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या या 9 ही आरोपींवर वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.9 people poisoned in the lockup of the police station

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी या आरोपींना सरकारी जेवण देण्यात आलं होत. मात्र जेवणाच्या काही काळानंतर या आरोपींना उलटीचा त्रास होवू लागला. त्यामुळे नालासोपारा पोलिसांनी त्यांना तत्काळ वसई विरार महानगरपालिकेच्या सोपारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. उपचारानंतर आता सर्व आरोपींची प्रकृती ठीक असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली आहे.

विष बाधा कशातून

ही विषबाधा नेमकी जेवणाने झाली कि इतर कोणत्या कारणाने याचा शोध घेण्यासाठी नालासोपारा पोलिसांनी उलटीचे नमुने हे चाचणीसाठी पाठवले आहेत. त्या दरम्यान आरोपींना इतर कोणी भेटायला आले होते का याचा पोलीस तपास करीत आहेत.

ML/KA/PGB
8 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *