पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल, बिनविरोध होण्याची शक्यता कमी

 पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल, बिनविरोध होण्याची शक्यता कमी

पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिंचवड मतदासंघांत भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यातील हेमंत रासने यांनी आपले अर्ज आज दाखल केले.

पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत अश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरला. दुःख उराशी बाळगून या निवडणुकीला आम्ही जगताप कुटुंब सामोरे जात आहोत. आज लक्ष्मण भाऊंची उणीव जाणवते आहे. आमचा विजय नक्की होईल असा विश्वास दिवंगत आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

कसबापेठ मतदासंघात हेमंत रासने यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला, यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते मात्र दिवंगत मुक्ता टिळक यांचे नातेवाईक गैरहजर राहिले.

काँग्रेसने ही उमेदवार दिला

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रविंद्र धंगेकराना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी रविंद्र धंगेकरानी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. तसेच मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केले. यावेळी रविंद्र धंगेकर यांना शैलेश टिळक यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे.

ML/KA/SL

6 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *