साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करू नका
वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करणे थांबवलेच पाहिजे.याहून लज्जास्पद स्थिती अजून किती आपण येऊ द्यायची? असा सवाल करीत ही स्थिती बंद करण्याची मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे.
साहित्य संमेलनात कितीही श्रेष्ठ पदांवरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला मग ते राष्ट्रपती असोत, पंतप्रधान, मुख्यमंत्री,कोणतेही मंत्री वा तत्सम यांना संमेलनाच्या व्यासपीठावर आमंत्रित करणे थांबवणेच गरजेचे आहे. त्यांना आमंत्रण दिले नाही म्हणून शासनाचे साहाय्य बंद होईल ही भिंती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्य शासनाचे उपकार नाहीत
राज्य,शासन,प्रशासन यांचे असे आर्थिक सहकार्य करणे हे कर्तव्य आहे,
उपकार नव्हेत.त्या मोबदल्यात आपली संमेलने ही पोलिस छावण्या करून घेणे थांबवण्याचा निर्णय महामंडळाने घ्यावा आणि घेऊन तो प्रत्यक्षात पाळावा.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षनाच अनेक ठिकाणी पोलिसांनी रोखल्याचे ट्विट त्यांच्या मुलीने केले , याहून अधिक संमेलन आणि संमेलन अध्यक्षांची अवहेलना दुसरी आपण काय करून घेणार आहोत?असा खडा सवाल डॉ जोशी यांनी आयोजकांना केला आहे.Don’t police the Sahitya Samela
ML/KA/PGB
5 Feb. 2023