अर्थसंकल्पीय आठवड्यात बाजारात तेजी

 अर्थसंकल्पीय आठवड्यात बाजारात तेजी

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत ): देशांतर्गत तसेच जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तोटा भरून काढला.भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023,कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक (ECB) आणि बँक ऑफ इंग्लंड (BoE) द्वारे व्याजदर वाढ, FII ची सततची विक्री आणि अदानी सुमूहाची गाथा यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली.

बुधवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर, शेअर बाजारात जोरदार रॅली होती परंतु शेवटच्या तासात बाजाराने आपला संपूर्ण फायदा गमावला.अदानी समुहाच्या समभागांवर सतत दबाव राहिल्याने बाजारातील अस्थिरता वाढली.या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांची मनस्थिती बिघडली.परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात स्मार्ट रिकव्हरी झाली. मार्केट ओव्हरसोल्ड असल्याने तसेच बँकिंग आणि वित्तीय समभागांमधील जोरदार खरेदीमुळे बाजारात जबरदस्त तेजी झाली.परंतु येणाऱ्या काळात बाजारात खास करून बँकिंग क्षेत्रात अस्थिरता जाणवेल.गुंतवणूकदारानी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. या अस्थिरतेचा लाभ घेऊन दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरेल.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडी आणि अदानी सुमूहा संदर्भातल्या बातम्या याकडे असेल.
Technical view on nifty-मार्केट ओव्हरसोल्ड आहे. या आठवड्यात निफ्टी 17922-17972-18053-18101-18163 हे स्तर गाठू शकते.निफ्टीसाठी 17795-17774-17761-17723 हे स्तर राखणे जरुरी आहे.

बाजाराची शानदार वापसी.The market makes a smart recovery

केंद्रीय अर्थसंकल्प आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड चढउतार पाहावयास मिळाले. गॅप-डाउन स्टार्टनंतर, सुरुवातीच्या तासांमध्ये मार्केट चांगले सावरलं पण सत्र जसजसे पुढे सरकले तसतसे चढ आणि उतार याच्यात गुंतले. 2022-23 च्या अर्थसंकल्पापूर्वी आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर निर्णयांपूर्वी बाजारातील गुंतवणूकदारानी सावध पवित्र घेतला. तसेच अदानी प्रकरणाचा बाजारावर संमिश्र परिणाम दिसला.त्यामुळे दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीला ब्रेक लागताना दिसला.आयटी, बँक आणि वित्तीय समभागांमध्ये खरेदी दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 169 अंकांनी वधारून 59,500 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 44 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,649 चा बंद दिला.

बाजार सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या चिन्हात बंद झाला

सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजार फर्स्ट हाफ मध्ये दबावाखाली होता आणि सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसाच्या 59,104.59 आणि 17,537.55 च्या नीचांकी पातळीवर गेले परंतु दुपारनंतर बाजार रिकव्हर झाला पण दिवसभर बाजार अस्थिर होता. केंद्रीय अर्थसंकल्प आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरण दराबाबत निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 49 अंकांनी वधारून 59,549 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 13 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,662 चा बंद दिला.

अर्थसंकल्पाच्या दिवशी अस्थिर सत्रात सेन्सेक्स १५८ अंकांनी वाढला

बुधवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात कमालीची अस्थिरता पाहावयास मिळाली. अर्थसंकल्पानंतर, शेअर बाजारात जोरदार रॅली होती परंतु शेवटच्या तासात बाजाराने आपला संपूर्ण फायदा गमावला 1200 अंकांच्या जवळपास वाढ झाल्यानंतर सुद्धा सेन्सेक्स उच्च पातळीपासून 1061 अंकांनी घसरला.बजेटच्या नंतर बहुतेक क्षेत्रांमध्ये विक्री झाली मात्र, आयटी समभाग आणि एफएमसीजी समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
मार्केट लिंक्ड डिबेंचर (MLDs) च्या आसपासच्या कर आकारणीवरील अनिश्चितता, घराच्या मालमत्तेवर सेट केलेल्या भांडवली नफ्यावर 10 कोटी रुपयांची मर्यादा आणि विमा क्षेत्रासाठी नकारात्मक धोरण या घोषणांमुळे ,तसेच अदानी समुहाच्या समभागांवर सतत दबाव राहिल्याने बाजारातील अस्थिरता वाढली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 158 अंकांनी वधारून 59,708 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 45 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,616 चा बंद दिला.

सेन्सेक्स २२४ अंकांनी वधारला.Sensex rises 224 points

गुरुवारी बाजार खाली उघडला, निफ्टीची लेवल 17,500 च्या खाली गेली पण बाजार लगेचच सावरला आणि सत्राचा बराच वेळ सपाट राहिला. शेवटच्या तासात झालेल्या खरेदीने मात्र सेन्सेक्सला ६०,००० च्या पुढे जाण्यास मदत केली. अदानी समूहाच्या शेअर्सच्या सततच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढताना दिसला.सेन्सेक्स समभागांमध्ये आयटीसीने 4.74 टक्क्यांची उसळी घेतली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 224 अंकांनी वधारून 59,932 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 6 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,610 चा बंद दिला.

सेन्सेक्स,निफ्टीची स्मार्ट रिकव्हरी.Sensex, Nifty make a smart recovery

बँकिंग आणि वित्तीय समभागांमधील जोरदार खरेदीमुळे शुक्रवारी प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीत एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली.यूएस स्टॉक मार्केटमध्ये झालेली तेजी,क्रेडिट रेटिंग एजन्सींनी अदानी समूहाच्या कंपन्यांवर दाखवलेला विश्वास व खालच्या पातळीवरून बाजारात झालेली खरेदी यामुळे बाजारात जबरदस्त तेजी झाली सेन्सेक्समध्ये ९०० अंकांहून अधिकची वाढ झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 909 अंकांनी वधारून 60,841वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 243 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,854 चा बंद दिला.
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

 

JS/KA/PGB
4 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *