काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या अर्थसंकल्पातील विशेष बाबी

 काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या अर्थसंकल्पातील विशेष बाबी

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रासाठीही विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. या तरतूदींमधील सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे येत्या काळात गटारे साफ करण्यासाठी माणसांचा वापर पूर्णपणे थांबवण्यात येणार असून गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित राहील.

त्याच बरोबर बदललेल्या कर रचनेमुळे काही वस्तू महाग तर काही वस्तू स्वस्त झाल्या आहे. अर्थसंकल्पातील या  महत्त्वाच्या बाबी थोडक्यात जाणून घ्या.

पायाभूत सुविधांसाठी तरतूदी

  •   ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टसाठी 75 हजार कोटी रुपये तर अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जाणार आहेत.
  •  ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील.
  •  मिशन कर्मयोगी नागरी सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याची घोषणा.

आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद 

  •  वैद्यकीय महाविद्यालयात अधिकाधिक लॅबची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन मशीन आणल्या जातील जेणेकरून भारतात सर्वात मोठ्या आजारावर यशस्वी उपचार करता येतील.
  • दरवर्षी रक्ताच्या कमतरते मुळे अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे 2027 पर्यंत अॅनिमिया हा आजार मुळापासून समूळ नष्ट करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.
  • गटारे साफ करण्यासाठी आता मॅनहोल मध्ये माणसे काम करणार नसून हे काम पूर्णपणे यंत्रांच्या मदतीने करण्यात येईल.

शिक्षण क्षेत्रासाठी तरतूदी

  • प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू होणार, 47 लाख तरुणांना राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती योजनेअंतर्गत 3 वर्षांसाठी भत्ता दिला जाणार.
  • तरुणांना जागतिक लेबल प्रशिक्षण देण्यासाठी 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्सची स्थापना केली जाईल.
  • नवोन्मेष आणि संशोधनासाठी नवे नॅशनल डेटाबेस गव्हर्नन्स धोरण तयार केले जाईल. ज्याचे फायदे स्टार्टअप्स आणि शिक्षणात मिळतील.
  • अभियांत्रिकी संस्थांमध्ये 5G सेवांवर आधारित 100 लायब्ररी स्थापन होणार
  • 2024 पासून, विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांसह 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उघडली जातील.
  • मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येईल.
  • 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 38,800 शिक्षक आणि सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.
  • 2023-24 मध्ये सरकार आदिवासींसाठी विशेष शाळा उघडणार असून त्यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
  • आर्थिक साक्षरतेसाठी NGO सोबत काम करण्याची योजना

क्रीडा क्षेत्रासाठी तरतूद

  •  अर्थसंकल्पात क्रीडा मंत्रालयाला पूर्वीपेक्षा जास्त निधी देण्याची योजना मांडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.०८ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून क्रीडा मंत्रालयाला ३०६२.६० कोटी रुपये अधिक मिळणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०५.५८ कोटी रुपये अधिक आहेत.
  • भारतातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी युवा कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय युवा सक्षमीकरण कार्यक्रमाला या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत २९ कोटी रुपये अतिरिक्त मिळाले आहेत

हे स्वस्त होणार

एलएडी टिव्ही, टीव्हीचे सुटे भाग, कॅमेरा लेन्स, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक कार, लिथिअम आयन बॅटरी, परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल

हे महागणार

शिष्ट ब्रॅन्डच्या सिगारेट, विदेशी किचन चिमण्या, परदेशातून आयात केलेली सोन्या-चांदीची भांडी, सोनं-चांदी, हिरे, प्लॅटिनम , छत्र्या, एक्स-रे मशीन

SL/KA/SL

2 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *