भाविकांच्या गर्दीने विठ्ठल भक्तीचा मळा फुलला

 भाविकांच्या गर्दीने विठ्ठल भक्तीचा मळा फुलला

सोलापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंढरपुरात माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मळा फुलला आहे . माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखाहून अधिकचे भावी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.

 

माघी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल मंदिरात पहाटेच्या नित्यमहापूजेने करण्यात आली. मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला नडगीरे यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्यमहापूजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाच्या आरतीनंतर एकादशीच्या सोहळ्यात सुरुवात झाली.

एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरास झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर परंपरेप्रमाणे विठ्ठल दर्शन , विठ्ठलाचे कळस दर्शन, चंद्रभागास्नान , नगर प्रदक्षिणा करण्यास भाविकांनी पहाटेपासूनच सुरुवात केली होती. या एकादशीच्या सोहळ्यासाठी बेळगाव ,कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा यासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथूनही भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.Vitthal Bhakti flower blossomed with the crowd of devotees

पदस्पर्श दर्शन रांग पाच किलोमीटर पेक्षा लांब गेल्याने विठ्ठल दर्शनासाठी साधारण सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे. भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर , भजन कीर्तनाचा रंग अशाने सारी पंढरी नगरी विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघाली आहे.

ML/KA/PGB
1 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *