नायगाव स्थानकात क्रेन- लोकल धडकेत मोटरमन जखमी

 नायगाव स्थानकात क्रेन- लोकल धडकेत मोटरमन जखमी

नायगाव,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वे  मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ  आज  विरार लोकल ट्रेनला  क्रेनच्या हुकचा फटका बसला. यात विरार लोकलचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. यात  मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत  झाली आहे.

नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कामासाठी क्रेन उभी करण्यात आली आहे. या  क्रेनच्या हुकचा फटका येथून जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनच्या काचेला बसला. मोटरनमच्या केबीजवळ या क्रेनच्या हुकाचा फटका बसला. यामुळे या अपघातात मोटरमनच्या डोक्याला दुखापत झाली तो असून गंभीर जखमी झाला आहे.

नायगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चर्चगेट विरार ही ट्रेन काल रात्री 12 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर येताच रेल्वेच्या कामासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेलरचा हुक ट्रेनच्या मोटरमॅन च्या डब्ब्याला समोरून लागला. यामुळे मोटरमनच्या केबीनची काच फुटली.

या अपघातात काचेचा तुकडा मोटरमॅन एम डी आरिफ यांच्या डोळ्याला आणि डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यामुळे ट्रेन नायगाव रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली. डोळ्यातून रक्तसत्राव होऊ लागला. जखमी मोटरमनना तात्काळ उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले.

SL/KA/SL

28 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *