लिंगायत समाजाचा महामोर्चा

 लिंगायत समाजाचा महामोर्चा

मुंबई, दि..28 (एम एमसी न्यूज नेटवर्क): लिंगायत धर्माला संविधानिक मान्यतासह अल्पसंख्याकाचा दर्जा द्या, लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा,
मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरु करा आणि विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा , इत्यादी मागण्यासाठी उद्या 29 जानेवारी रोजी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आझाद मैदानात राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात लिगायत समाजाचे लाखो लोक सहभागी होणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसिकर, यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्यात एक कोटी व दक्षिण भारतात 8 कोटींच्या वर असणारा लिंगायत समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करित आहे. विषेशतः गेल्या 8 वर्षापासून देशभरातल्या सर्व संघटना एकत्र करून स्थापन झालेल्या अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत 22 महामोर्चे झाले आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातल्या 10 जिल्हयांचा समावेश आहे. नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, नाशिक, या जिल्हयात लाखोच्या संख्येने महामोर्चे झाले आहेत. त्याचा पुढील टप्पा म्हणून येत्या 29 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा होणार आहे यात लाखो लिंगायत समाज सहभागी होणार आहे. असे ऍड भोसीकर यांनी सांगितले.
यावेळी लिंगायत धर्म पीठाचे अध्यक्ष जगदगुरु श्री चण्णबसवांनद महास्वामी, सुधीर सिंहासने, विजयकुमार हत्तुरे, आर.एस.देरींगे, बी. एस. पाटील, अॅड. माधवराव पाटील, सतिश कुमार पाटील आदी उपस्थित होते.

SW/KA/SL

28 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *