मुंबईत ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पुरवठा
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४ हजार मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणे, जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी आणि दोन ठिकाणी गळती दुरुस्तीची कामे मुंबई महानगर पालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे.Supply at low pressure till 4th February in Mumbai
नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे २९ जानेवारी तसेच ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान पालिकेच्या 12 विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा खंडित असण्याच्या व कमी दाबाने होण्याच्या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सोमवारी, ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते मंगळवारी, ३१ रोजी सकाळी १० पर्यंत वांद्रे ते दहिसर पट्ट्यातील १२ विभागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे तर दादर, वरळी या दोन विभागांत २५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
पश्चिम उपनगरातील वांद्रे एच पूर्व आणि वांद्रे एच पश्चिम, अंधेरी के पूर्व,अंधेरी के पश्चिम, गोरेगाव पी दक्षिण,मालाड पी उत्तर, कांदिवली आर दक्षिण , बोरवली आर मध्य, दहिसर आर उत्तर या नव विभागातील तसेच पूर्व उपनगरातील भांडुप एस विभाग, घाटकोपर,एन विभाग आणि कुर्ला एल विभागातील अनेक भागातदेखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. या व्यतिरिक्त दादर जी उत्तर आणि वरळी जी दक्षिण या दोन् विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम ,प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात 25% कपात करण्यात येणार आहेत तर धारावी परिसरात 30 जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे
ML/KA/PGB
25 Jan. 2023