संक्रांतीच्या निमित्त रुक्मिणी मातेस सुवर्ण अलंकार
सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली , महिलांकडून अभिषेक घालण्यात आला, यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचा लेणं असणार वानवसा रुक्मिणीमातेसमोर महिलांनी अर्पण केला.Gold ornaments for Rukmini Mata on the occasion of Sankranti
याने संक्रांतीच्या भोगी सणाची सुरुवात करण्यात आली संक्रांती दिवशी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी असते. यानिमित्त रुक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल करण्यात आले असून महिलांना रुक्मिणी मातेच्या विलोभनीय रूपाचं दर्शन व्हावं यासाठी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
सकाळपासूनच वाढावासा खरेदी करून रुक्मिणी मातेचा मानवाचा करण्यासाठी बाजारात देखील महिलांची मोठी गर्दी होती.
ML/KA/PGB
14 Jan. 2023